Pune : तेरा भाई किधर हैं , उसको बुला म्हणल्यामुळे कपाळावर लावुन गोळी झाडून तरुणाचा खून !
Pune News : पुणे शहरातील खडक पोलीसांनी टोळीतील चार जणांना मकोका अंतर्गत अटक केली आहे. नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा (टोळी प्रमुख), गणेश उल्हासराव शिंदे, रोहीत संपत कोमकर आणि अमन दिपक परदेशी या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हे वाचा – १२ वि पास नोकरी , ३५ ०००० पगार राहणे खाणे कंपनीचे या आहेत नोकऱ्या !
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री फिर्यादी हे त्यांचे राहते घरी झोपले असताना, त्यांच्या घराच्या दरवाजा वाजवल्या मुळे फिर्यादी यांनी घराचा दरवाजा उघडला असता, दरवाज्या बाहेर उभा असलेल्या नवनाथ ऊर्फ नब्या याने फिर्यादीस तेरा भाई किधर हैं असे विचारून, उसको बुला असे म्हणल्यामुळे फिर्यादी यांनी त्यांचा चुलत भाऊ अनिल यास बाहर कोई आपको बुला रहा हैं असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी यांनी किचन मध्ये पाणी पिऊन दरवाज्याकडे पाहिले. त्यावेळी अनिल हा नवनाथ ऊर्फ नब्या याबरोबर बोलत असताना, त्याने अनिल यास काहीतरी विचारले असता, अनिल याने मान हालवुन नकार दिला. त्याच वेळी नवनाथ ऊर्फ नब्या याने बंदुक काढून, फिर्यादीचा चुलत भाऊ अनिल याच्या कपाळावर लावुन गोळी झाडून त्यास गंभीर जखमी करून त्यांचा खुन करून, फिर्यादीचे राहते इमारती बाहेर थांबलेल्या त्याच्या साथीदारांसह दुचाकीवर बसून घाई गडबडीने निघून गेला.
हे वाचा – १० वि पास नोकऱ्या पुण्यात , राहणे खाणे मोफत इथे पहा नोकऱ्या
या घटनेत फिर्यादीचा चुलत भाऊ अनिल यांचा मृत्यू झाला. फिर्यादी यांच्या फिर्यादीवरुन खडक पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. 369/2023, भा. द. वि. कलम 302,34, आर्म अॅक्ट कलम 3(25), महाराष्ट्र पोलीस कायदा सन १९५१ चे कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा वय ३७ वर्षे, रा. श्रीकृष्ण हाईटस ५१२, घोरपडे पेठ पुणे (टोळी प्रमुख) २) गणेश उल्हासराव शिंदे, वय ४१ वर्षे, रा. चव्हाणनगर, धनकवडी पुणे ३) रोहीत संपत कोमकर, वय ३३ वर्षे, रा. ७१५ गुरूवार पेठ, पुणे ४) अमन दिपक परदेशी, वय २९ वर्षे, रा.४१, घोरपडे पेठ, पुणे (टोळी सदस्य) यांनी केला असुन सदर गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपी नवनाथ लोधा हा टोळीचा प्रमुख आहे. तो पूर्वीही गुन्हेगारी कृतीतून अटकेत आला आहे. गणेश शिंदे आणि रोहित कोमकर हे देखील टोळीतील सदस्य आहेत. अमन परदेशी हा नवनाथ लोधाचा मित्र आहे.
पोलिसांनी या आरोपींना अटक केल्याने शहरात गुन्हेगारीवर आळा बसेल अशी अपेक्षा आहे.