तामिळनाडूमध्ये पावसाचा तांडव, २ दिवसांत पुरामध्ये १० जणांचा मृत्यू

पुणे,दि.२० डिसेंबर २०२३ : तामिळनाडूमध्ये गेल्या दोन तीन दिवसांत पावसाचा तांडव सुरु असून गेल्या दोन दिवसांत पुरामध्ये तिरुनेलवेली व तुतिकोरिन जिल्ह्यांत १० जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाच्या अतिवृष्टीमुळे येथील जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून, पाणी साचल्यामुळे शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात अली आहे.

दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांत रस्त्यावर पाणी साचले आहे. सगळीकडे पूरसदृश्य वातावरण झाले असून सामान्य लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तामिळनाडूमधील तिरुनेलवेली जिल्ह्यात मनीमुथर धबधबा कोसळला आहे. त्यामुळे तिरुनेलवेली आणि थूथुकुडी या जिल्ह्यांत परिस्थिती जास्त वाईट असून गेल्या दोन दिवसांत १० जणांचा मृत्यू झाला आहे.

मुसळधार पावसामुळे तिरुनेलवेली, थूथुकुडी आणि तेनकासी या जिल्ह्यांत शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. टायफून मिचँग व दक्षिणेकडील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहून हे भाग राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावे अशी विनंती तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना केली आहे. दक्षिणेकडील आतापर्यंतचा रेकॉर्डब्रेक पाऊस असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment