Breaking
25 Dec 2024, Wed

हिंजवडीत धक्कादायक प्रकार, आयटीमध्ये काम करणाऱ्या तरुणीची गोळी झाडून हत्या

पुणे,दि. २८ जेवरी,२०२४ : हिंजवडीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीची गोळी झाडून हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे संपूर्ण शहारत खळबळ उडाली आहे. शहरातील ओयो हॊटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला असून, प्रेम प्रकरणातून हि हत्या झाल्याचे समोर आले आहे.वंदना दिवेदि ( वय २६ वर्ष )असं मृत तरुणीचं नाव आहे.


हिंजवडीतील आयटी हबमध्ये एका इंजिनिअर तरुणीवर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. मृत तरुणी गेल्या दोन दिवसांपासून तिच्या मित्रासोबत एका लॉजमध्ये वास्तव्यात होती,लखनऊ वरून आलेला तिचा मित्र ऋषभ निगम याने तिची हत्या केल्याची माहीती समोर आली आहे. मागील दोन दिवसांपासून हे दोघे ओयो टाऊन हाऊस या लॉजमध्ये राहत होते. ऋषभ हा वंदनाला लखनऊहुन भेटायला आला होता मात्र दोघांमध्ये वाद झाला व त्याने वंदनाच्या डोक्यात दोन गोळ्या झाडून तिची हत्या केली व तेथून मुंबईला फरार झाला. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी नाकाबंदी करत त्याला अटक केली. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेले गेलेलं पिस्टल जप्त करण्यात आले आहे.

आपल्या प्रेयसीच्या डोक्यात अल्पशा वादातून डोक्यात गोळ्या झाडून तिची निर्दयपणे हत्या केली व त्यानंतर ती मयत झाली कि नाही हे बघून आरोपी निमूटपणे तिथून निघून गेला. हि घटना प्रेम मप्रकरणातून झाली असून माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *