जालना मुंबई ‘वंदे भारत’एक्सप्रेस 30 डिसेंबरला धावणार, वर्षाच्या अखेरीस होणार सुरुवात

पुणे,दि.26 डिसेंबर ,2023 : जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस अखेर वर्षाच्या शेवटी धावणार, 30 डिसेंबरला जालना रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस मुंबईकडे रवाना होणार अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस अखेर वर्षाच्या शेवटी म्हणजे 30 डिसेंबर रोजी जालना रेल्वे स्थानकावरून मुंबई मार्गाकडे रवाना होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यांनी दिली आहे. हि रेल्वे 30 डिसेंबर रोजी सकाळी 5.05 मिनिटांनी सुटण्याचे नियोजन केलं आहे.

या एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा प्रवास चांगला व जलदगतीने होण्यास मदत होणार आहे. भारतीय रेल्वेचे जाळे भारतभर जोडण्याच्या हेतूने पाऊल पुढे टाकत आहे.त्याचाच भाग म्हणून हि एक्सप्रेस चालू करण्यात येणार आहे.वेगवेगळ्या खासगी कामासाठी बऱ्याच वेळी प्रवाशांना तात्काळ हा प्रवास करणे शक्य होत नाही परंतु आता मुंबईला जाण्यासाठी वंदे भारत मुळे प्रवाशांना मदत होणार आहे.

या मार्गातील सिग्नल यंत्रणा, रेल्वे मार्ग मजबूत करण्यात आले आहेत.आता 30 डिसेंबर रोजी जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.

हे वाचा

जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक असे असेल

हि गाडी जालना रेल्वे स्थानकावरून पहाटे 5.05 मिनिटांनी सुटून 5.54 वाजता छत्रपती संभाजीनगर व नाशिकमध्ये सकाळी 8.40 मिनिटांनी पोचेल. ठाणेमध्ये 11.10 तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला 11.55 मिनिटाला हि गाडी प्रत्येक स्थानकावर 2 मिनिट थांबत पोचेल.

Leave a Comment