Jammu Kashmir News: दुःखदायक बातमी ,पुंछमध्ये लष्कराच्या गाडीवर दहशतवादी बॉम्ब हल्ला …….!

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या वाहनाला आग लागल्याने पाच जवान शहीद झाले. प्रत्यक्षात त्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला होता. संध्याकाळी उशिरा या घटनेबाबत लष्कराकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेचा फायदा घेत अज्ञात दहशतवाद्यांनी बेर गली आणि पूंछ दरम्यान धावणाऱ्या लष्कराच्या वाहनावर गोळीबार केल्याचे लष्कराने म्हटले आहे. दहशतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेडमुळे गाडीला आग लागल्याचा संशय आहे.

PAFF या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Poonch Terror Attack : जवानांच्या शरीरात चिनी गोळ्या , दहशतवादी कि चिनी लष्कराने केला हल्ला ?

दुसरीकडे, या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट PAFF (PAFF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. PAFF हे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे सुधारित रूप आहे. ज्याने यापूर्वीही अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास पूंछ जिल्ह्यातील भटादुरिया भागात लष्कराच्या वाहनाला आग लागली. यामध्ये पाच जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे. त्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम राबवण्यात आली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लष्कर आणि पोलिसांच्या पथकांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम राबवली. त्यानंतर सायंकाळी लष्कराकडून निवेदन देण्यात आले आहे.

Leave a Comment