पुणे, दि.१८ डिसेंबर २०२३ :कल्याण नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात ऐकून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आठ मृतांपैकी ४ जण हे एकाच कुटुंबातील आहेत. यामध्ये दोन लहान मुले व एक महिला आहे. रिक्षा, ट्रक आणि टेम्पो यांच्यात हा भीषण अपघात झाला आहे.
या अपघातातील टेंम्पो कल्याणकडे जात होता तर रिक्षा आणि ट्रक ओतूरकडे येत असताना हा अपघात झाला. अपघातात कोमल मस्करे , गणेश मस्करे काव्या मस्करे व हर्षद मस्करे या एकाच कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला आहे. रिक्षा चालकाचे नाव नरेश दिवटे असे होते तर इतर तीन जणांची अद्याप ओळख पटलेली नाही.
टेम्पोमधील मृत प्रवाससी हे जुन्नरमधील मढ पारगावचे रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातातील जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ओतूर ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक सचिन कांडगे व इतर कर्मचाऱ्यांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती कांडगे यांनी दिली आहे.