Lalbaugcha Raja First Look: मुंबईच्या ‘लालबागचा राजा’ चा पहिला लूक अनावरण
मुंबईतील गणेशोत्सवाचं आकर्षण असलेल्या लालबागचा राजा (Lalbaugcha Raja First Look) चा पहिला लूक अखेर गणेश चतुर्थीच्या अगोदर अनावरण करण्यात आला आहे. यावर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे.
ANI ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लालबागचा राजाचा भव्य आणि देखणा पहिला लूक दाखवण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये गणेशोत्सवासाठी केलेली तयारी, सजावट आणि भाविकांचा उत्साह पाहायला मिळतो.
लालबागचा राजा हा गणेशोत्सवाच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय गणेशोत्सवांपैकी एक आहे. प्रत्येक वर्षी लाखो भाविक या गणपतीच्या दर्शनासाठी लालबाग मंडळाकडे येतात आणि आपले नवस फेडतात.
गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर या वर्षी देखील लालबागच्या राजाचे आगमन थाटात होणार आहे.
#WATCH | First look of Mumbai’s Lalbaugcha Raja unveiled ahead of Ganesh Chaturthi pic.twitter.com/rZ7G1QZ5zv
— ANI (@ANI) September 5, 2024