पुणे, दि. 17 डिसेंबर 2023: लिबियाच्या समुद्रात जहाजाचा भीषण अपघात झाला आहे. जहाजमध्ये असणाऱ्या 61 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
या जहाजमध्ये ऐकून 86 प्रवासी प्रवास करत होते. हे जहाज लिबियातील जवरा शहरातून समुद्रमार्गे युरोपकडे जात असताना ही दुर्घटना घडली. या अपघाताची माहिती लिबियातील (IOM) इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन च्या सोर्सेसने दिली आहे. अपघाताचे कारण अद्याप समोर आले नाही.