Lok Sabha Elctions 2024 :लोकसभा निवडणुक २०२४ पाचव्या टप्प्यातील राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. मतदारांनी उत्साहाने मतदान प्रक्रियेत भाग घेतला असून, सकाळच्या सत्रात मतदानाच्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे.
प्रमुख मतदारसंघांमधील सकाळी ९ वाजेपर्यंतचे मतदानाचे टक्केवारी खालीलप्रमाणे आहे:
- धुळे: ६.९२ टक्के
- दिंडोरी: ६.४० टक्के
- नाशिक: ६.४५ टक्के
- पालघर: ७.९५ टक्के
- भिवंडी: ४.८६ टक्के
- कल्याण: ५.३९ टक्के
- ठाणे: ५.६७ टक्के
मतदान प्रक्रिया शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित रित्या सुरू आहे. प्रशासनाने मतदान केंद्रांवर सुरक्षेची कडक व्यवस्था केली आहे. नागरिकांनी आपले मतदानाचे हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला आहे.
मतदानाचा हा टक्का दिवसभर वाढण्याची शक्यता असून, पुढील काही तासांत मतदान प्रक्रियेत आणखी गती येण्याची अपेक्षा आहे. LokSabhaElections2024