मराठी पाट्या नसणाऱ्यांना महानगरपालिकेकडून नोटीसा, प्रत्येक दुकानं,शोरूमवर मराठी पाटी बंधनकारक.
पुणे,दि.22 डिसेंबर,2023: मराठी पाट्यांसाठी मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)सध्या ऍक्शन मोड मध्ये आहे. मुंबई हे महाराष्ट्रात असुन सुद्धा इथे मराठी पाट्या खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. महाराष्ट्राची राजधानी म्हणजेच ‘मुंबई’ला स्वप्नांचं शहर म्हणूनही ओळ्खले जाते. इथे विविध राज्यांतील लोकं कामासाठी येतात. अशा वेळी येथील परिसरात, भाषेत व दुकानांवर असलेल्या पाट्यांच्या बदलामुळे मनसेने ‘मराठी पाटी’ची सक्ती केली आहे.
मुंबईत ऐकून 7 लाख दुकानं असून त्यांपैकी फक्त 28 हजार दुकानांवर मराठी पाटी असल्याची माहिती मुंबई पालिकेनं दिली आहे. त्यामुळे मराठी पाट्यांबाबत कायदा पाळा अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यालयालयाच्या आदेशावरून आता ठाणे मनपाच्या हद्दीमध्ये मराठी पाट्या बदलण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यन्त 2066 दुकानांना नोटिसा देण्यात आल्या आहेत तर काही ठिकाणी दुकानदारांनी मराठी पाट्या लावायला सुरवात केली आहे. मनसे सोबतच आता मुंबई महानगरपालिका सुद्दा ऍक्शन मोडवरती असून ‘मराठी पाटी’ची मोहीम चालू आहे.