Nilesh lanke birthday : वाढदिवस निमित्त निलेश लंके यांचे आवाहन

0

उद्या दिनांक १० मार्च २०२४ रोजी माझा वाढदिवस असून सदर दिवशी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही. आपण सर्वजण वाढदिवसाच्या निमित्ताने मला भेटायला येत असतात.
तरी सदर वाढदिवसाच्या दिवशी कोणी मला भेट स्वरूपात माझा सन्मान करण्यासाठी हार, फुले, शाल, श्रीफळ व कोणतीही वस्तू आणू नये, त्या मी स्वीकारणार नाही.
जे काय द्यायचंय पोरांना द्या,
काहीच नको मला!

आपली काही देण्याची इच्छाच असेल तर!

1-गरीब/ निराधार/विद्यार्थी यांच्यासाठी शालेय साहित्य भेट द्या.
(उदा-वही, पेन, कंपास पेटी इतर साहित्य)
2-शालेय विद्यार्थी यांच्यासाठी चप्पल द्या.
3-जेष्ठ नागरिकांसाठी काठी द्या.
4-अपंग बांधवासाठी-तीनचाकी सायकल,वॉकर व इतर साहित्य द्या.
5-गरीब/निराधार विद्यार्थी यांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रतिष्ठानच्या खात्यावर देणगी स्वरूपात मदत करू शकता.

आपलाच जनसेवक श्री. निलेश ज्ञानदेव लंके पारनेर-नगर विधानसभा मतदार संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *