Pune : एक छोटी चूक, मोठी दुर्घटना! पुण्यात लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी !

Pune News : लोहगाव येथील तांत्रिक व नागरी विमानतळ परिसरात विमान व हेलिकॉप्टरचे नियमित उड्डाण सुरू असते. रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशादर्शक सिग्नल देण्यासाठी रनवेवर व एटीसी टॉवरवरून लाईटचा वापर केला जातो. (Pune News Marathi )मात्र, अलीकडील काही कार्यक्रमांमध्ये आकाशात प्रखर बीम लाईट व लेझर लाईट सोडल्या जात असल्यामुळे वैमानिकांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय वायुसेनेचे निरीक्षण:
भारतीय वायुसेनेने निदर्शनास आणून दिले आहे की, अशा प्रकारच्या लाईटमुळे वैमानिकांचे डोळे दिपू शकतात आणि त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने तातडीची कारवाई आवश्यक आहे.




सुरक्षा संहितेनुसार कारवाई:
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार, विशेष अधिकार प्राप्त पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, लोहगाव वायुसेना व नागरी विमानतळाच्या १५ कि.मी. परिसरात व पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही कार्यक्रमामध्ये प्रखर बीम लाईट व लेझर लाईट आकाशात सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.




प्रतिबंध कालावधी आणि शिक्षेचे प्रावधान:
हा आदेश ९ मे २०२५ पासून पुढील ६० दिवसांपर्यंत अंमलात राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कारवाई केली जाईल आणि शिक्षा होऊ शकते.

पुणे शहरातील नागरिकांनी व कार्यक्रम आयोजकांनी हा आदेश गांभीर्याने घ्यावा, विमान सुरक्षा व सार्वजनिक सुरक्षेसाठी सहकार्य करावे. प्रशासनाकडून कोणतीही कारवाई टाळण्यासाठी या आदेशाचे पूर्ण पालन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment