Pune Latest News Today:: पुण्यातील खंडोजीबाबा चौक, कर्वेरोड येथे (Pune News )भीषण अपघात झाला असून अहील्यानगर (Ahmdnagar) येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. २ फेब्रुवारी २०२५) रात्री ११:१५ च्या सुमारास घडला. एका भरधाव वेगात असलेल्या कार चालकाने वाहतुकीचे नियम तोडत एका दुचाकीस्वाराला धडक दिली आणि घटनास्थळावरून फरार झाला.
Pune Latest News Today: अपघाताचा तपशील: अपघातग्रस्त विनायक साहेबराव थेटे (वय ३०, रा. कोल्हार भगवतीपूर, ता. रहाता, जि. अहील्यानगर) हे मोटारसायकलवर प्रवास करत असताना आरोपी राहुल थेटे (वय ३४, रा. रहाटणी, पुणे) याने आपल्या ताब्यातील कार वेगात व बेफिकिरीने चालवत विनायक थेटे यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात विनायक थेटे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळी न थांबता फरार झाला.
अपघातानंतर परिसरात खळबळ या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. अपघातग्रस्त कुटुंबावर शोककळा पसरली आहे.