Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

Pune : पुण्यात डंपरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, चालक फरार

पुण्यात डंपरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, चालक फरार

Pune : दि. ०१ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे जिल्ह्यातील थेऊर(Pune News) गावच्या हद्दीत गणेशवाडी एच पी पेट्रोल पंपाजवळ एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, अपघातास कारणीभूत असलेला डंपर चालक फरार झाला आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४२९/२०२४ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (ए), १२५ (ब), १०६ (१), आणि मोटार वाहन कायदा कलम १३४, १८४, ११९/११७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अनिकेत पवार (वय ३१ वर्षे, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी तक्रार दिली आहे.

 

तक्रारीनुसार, आरोपी संदेश लक्ष्मणराव पवार (वय ३३ वर्षे, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) याने त्याच्या ताब्यातील डंपर वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने व भरधाव वेगात चालवत फिर्यादीचे भाऊ अभिजीत सुरेश पवार (वय ३६) आणि त्यांचे वडील सुरेश प्रभाकर पवार (वय ६२) यांना कारला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी घटनास्थळी न थांबता पळून गेला.

 

या प्रकरणात पोलिसांनी आरोपी संदेश पवार याला नोटीस दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More