जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
पुणे,दि.१३ डिसेंबर,२०२३: मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मराठी सृष्टीतील जुना नट हरवल्यामुळं सगळीकडे शोकाकुल पसरला आहे.
रवींद्र बेर्डे हे मागील काही दिवसांपासून आजारी होते.माहितीनुसार,त्यांना घशाचा कर्करोक झाला होता. त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती चांगली झाल्यावर त्यांना घरी पाठवण्यात आले पण काही दिवसांनी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रवींद्र बेर्डे हे उत्तम कलाकार होतेच पण मराठी सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. त्यांनी आपल्या भावासोबत अनेक चित्रपटांत काम केलं. त्यांच्या या जोडीला प्रेक्षकवर्ग भरभरून प्रेम द्यायचे. चित्रपटासोबत त्यांनी अनेक नाटकांतही काम केले. त्यांचं गाजलेलं नाटक ‘शांतच कार्ट चालू आहे’ या नाटकात त्यांनी सुधीर जोशी, नयनतारा या दिग्गज कलाकारांसोबत काम केले.
रवींद्र बेर्डे यांनी काम केलेले चित्रपट:
एक गाडी बाकी अनाडी, चंगू – मंगू, खतरनाक, धडाकेबाज, हमाल दे धमाल, झपाटलेला, भुताची शाळा. सिंघम अशा अनेक चित्रपांमध्ये त्यांनी आपली छाप सोडली आहे.
त्यांच्या पाठी त्यांची दोन मुलं, पत्नी,सुना व नातवंड असा परिवार आहे.