पुणे शहरब्रेकिंग

Pune : मुलांचे तसले विडिओ व्हायरल करण्याची धमकी ;शिक्षण संस्थेच्या चालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

पुणे, २२ मार्च २०२५ – सिंहगड रोड पोलीस ठाणे हद्दीतील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संस्थापक/अध्यक्ष यांना त्यांच्या मुलाचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस सिंहगड रोड पोलिसांनी अवघ्या ५ तासांत अटक केली आहे. आरोपी सुदर्शन कांबळे हा या शिक्षण संस्थेचा माजी कॅमेरा आणि संगणक तज्ञ होता.
गुन्ह्याची पार्श्वभूमी
दिनांक २० मार्च २०२५ रोजी तक्रारदार यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, गुन्हा रजि. नं. १५५/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८ (२) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीने तक्रारदारांना वेळोवेळी धमक्या देऊन खंडणीची मागणी केल्याचे उघड झाले आहे.
तात्काळ कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप दाईंगडे यांनी तातडीने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना चौकी अधिकारी आणि तपास पथकाला दिल्या. पथकाने केवळ जुजबी माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या ५ तासांत आरोपी सुदर्शन कांबळे याला धायरेश्वर मंदिराजवळील त्याच्या घराजवळून ताब्यात घेतले आणि अटक केली.
पोलिसांची प्रभावी कामगिरी
ही यशस्वी कारवाई सहायक पोलीस आयुक्त श्री. अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप दाईंगडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे, सपोनिरी समीर चव्हाण, पोउपनिरी सुरेश जायभाय, संतोष भांडवलकर, सागर पवार तसेच पोलीस अंमलदार तारु, केकाण, शिंदे, बांदल, मोहिते, पांडोळे, पाटील आणि भोरडे यांचा समावेश होता.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *