Pimpri Chinchwad : बाथरूममध्ये धक्का लागला विद्यार्थ्याच्या डोक्यात कोयत्याने वार

Pimpri Chinchwad | Chinchwad College Fight | Crime News
पिंपरी चिंचवड येथील एका कॉलेजच्या बाहेर धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका विद्यार्थ्याला लोखंडी कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
दिनांक ०८/०८/२०२५ रोजी दुपारी १२:१० वाजता चिंचवड येथील आय.आय. बी. एम. इंस्टीट्युटच्या मेन गेटजवळ हा प्रकार घडला. फिर्यादी अभिषेक दिपक साठे (वय २२) हा विद्यार्थी कॉलेजमध्ये गेला असताना आरोपी मोहित अनंत लांडगे याला बाथरूममध्ये धक्का लागला होता. यावरून आरोपीने अभिषेकला शिवीगाळ करून धमकी दिली होती.
त्याच रागातून मोहितने आपला मित्र शिवम वाळुंज याला सोबत घेऊन पुन्हा अभिषेककडे गेला. मोहितने अभिषेकला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. याचवेळी त्याचा मित्र शिवमने अभिषेकच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने जोरदार वार करून त्याला गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर अभिषेकने पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सध्या दोन्ही आरोपी फरार असून, पिंपरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किर करत आहेत.
Pune Police | Pimpri Police Station | Student Assault
ही घटना कॉलेज परिसरात होणाऱ्या हिंसाचाराकडे लक्ष वेधते. विद्यार्थ्यांमध्ये वाढलेल्या हिंसक प्रवृत्ती चिंतेचा विषय आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरित तपास करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी जोर धरत आहे.