बनावट ४२ भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात पिंपरी चिंचवड पोलीसांची यशस्वी कामगिरी

बांगलादेशी इसमांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेले ४२ भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात मिळविले यश

पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत साईनाथनगर येथे भारतामध्ये अनधिकृतरित्या वास्तव्यास असणाऱ्या ५ बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यात आला. याप्रसंगी, निगडी पोलीस स्टेशनने गुन्हा रजि. नं. २०/२०२४, परकीय नागरिक १९४८ चे कलम १४, पासपोर्ट अधिनियम १९६७ चे कलम ३, ६, पारपत्र (भारतामध्ये प्रवेश) १९५० चे कलम ३ (अ) प्रमाणे २१ जानेवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल करून सदर बांगलादेशी घुसखोरांना अटक केली होती. याबाबतचा पुढील तपास निगडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री. अंबरिष देशमुख यांनी केला.

 

 

 

बँकेत नोकरीची संधी! 80,000 पेक्षा जास्त पगार, 450 हून अधिक जागा!

या सखोल तपासात आणखी काही बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळविल्याचे आढळले. यावर तपास अधिकारी सपोनि देशमुख यांनी दहशतवाद विरोधी शाखा आणि परदेशी नागरिक नोंदणी विभाग, विशेष शाखा-२ यांच्या मदतीने प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे येथे पत्रव्यवहार करून सदर माहिती दिली. या विनंतीच्या आधारे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांनी कायदेशीर कार्यवाही करून ४२ भारतीय पासपोर्ट रद्द केले आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या या यशस्वी कामगिरीमुळे एकाच वेळी ४२ बनावट पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत. या उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस आयुक्त मा.श्री. विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त मा.श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, मा.श्री. संदीप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ मा.श्रीमती स्वप्ना गोरे, आणि डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त, परि- III तथा नियंत्रण अधिकारी ए.टी.बी. यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. नितीन लांडगे, पोलीस निरीक्षक, परकीय नागरिक नोंदणी विभाग, विशेष शाखा-२, दहशतवाद विरोधी शाखा, पिंपरी चिंचवड येथील अधिकारी व अंमलदार तसेच निगडी पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी सपोनि श्री. अंबरिष देशमुख यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

Leave a Comment