मालगाडी रुळावरून घसरल्याने कसारा घाटातील वाहतूक ठप्प.

0


नाशिक,दि.11डिसेंबर 2023: इगतपुरी ते कसारा घाट दरम्यान मुंबई रेल्वे मार्गाकडुन येणाऱ्या मालगाडीचे सात डब्बे रुळावरून घसरल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन इतर प्रवाशी गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.हि घटना रविवारी रात्री सात च्या दरम्यान घडली आहे.

कसारा ते इगतपुरीकडे येणाऱ्या मार्गावरून गाडी घसरल्याने घाटात मालगाडीचे सात डब्बे रुळाच्या खाली गेले. या घाटात तीन रेल्वे मार्ग आहेत.त्यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे त्याचा परिणाम घाटातील मध्य मार्गवर झाला आहे. या अपघातामुळे उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर कोणताच परिणाम झाला नाही परंतु मुंबईहुन नाशिक मार्गाने जाणाऱ्या प्रवाशी गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई – फिरोजपूर पंजाब मेल, मुंबई – मनमाड – पंचवटी, मुंबई – नांदेड अशा त्या मार्गावरील एक्सप्रेस रोखून धरण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे. तसेच, अनेक गाड्यांचे मार्ग बसदलण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *