पुण्याचे खासदार आणि माजी मंत्री श्री.गिरीशजी बापट यांच्या निधनाचे वृत्त वेदनादाई आहे.पुण्याचे “सर्वसमावेशक नेतृत्व” अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. खा.गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
‘अजातशत्रू’, पुण्याचे खासदार स्व.गिरीशजी बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. चार दशकांच्या प्रदीर्घ सामाजिक-राजकीय कारकीर्दीत त्यांनी पुण्याची उत्कृष्ट जडणघडण केली.. “पुण्याची ताकद, गिरीश बापट” ही त्यांची ओळख कायम स्मरणात राहील.. ॐ शांती..
लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश_बापट यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी दिनानाथ हॅास्पिटल मध्ये दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. राजकारणातील गेल्या पाच दशकातला विरोधी व सत्ताधारी भाजपाचा दमदार नेता हरपला. मा. गिरीश बापट यांना भावपूर्ण_श्रद्धांजली!
भाषेवर मजबूत पकड असलेले, उत्तम वक्ते आणि पुण्याचे जेष्ठ नेते खासदार गिरीश बापट साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी दिनानाथ हॅास्पिटल मध्ये दीर्घ आजाराने दुःखद निधन. पुणे शहर व पुणे जिल्ह्यात भाजपचे स्थान भक्कम करणारे हरहुन्नरी नेतृत्व हरपले. मा. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
महाराष्ट्राचे माजी मंत्री व लोकसभेचे विद्यमान खासदार गिरीशजी बापट यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. गिरीश बापट जी हे एक अत्यंत उत्तम संसदपटू होते कार्यकर्ता, नगरसेवक आमदार, मंत्री व खासदार असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. गिरीशजी बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.