माणसांना महिलांना पडतोय डायरेक्ट टक्कल ! प्रशासनाकडून या समस्येवर योग्य उपाययोजना सुरू

बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव परिसरातील काही गावांमध्ये पाण्याच्या वापरामुळे नागरिकांमध्ये केस गळतीची समस्या उद्भवत असल्याचे आढळून आले आहे. प्रशासनाने या गावांतील पाणी पिण्यास व घरगुती वापरासाठी अयोग्य असल्याचे जाहीर केले आहे.

प्रमुख मुद्दे:

  • बाधित गावे: कालवड, बोंडगाव, कठोरा, भोनगाव, हिंगणा वैजिनाथ, बुई, माटरगाव, पहुजीरा आणि निंदी.
  • रुग्ण संख्या: १०० हून अधिक नागरिक प्रभावित; ११ गावे बाधित.
  • वैद्यकीय पथक: राज्यस्तरीय व वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ज्ञ लवकरच या गावांना भेट देणार.

जलतपासणी अहवाल:

  • स्थानिक बोअरवेल व विहिरींच्या पाण्यात नायट्रेट व टिडिएस प्रमाण अधिक.
  • पाण्यातील आरसेनिक व लीड (हेवी मेटल्स) तपासणीची गरज.
  • पाण्याचे नमुने नागपूर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले; अहवाल आठ ते दहा दिवसांत येणार.
  • वारी हनुमान धरणातील पाणी सुरक्षित असल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट.

जिल्हाधिकारी यांचे आवाहन:

  • नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; या समस्येमागे कोणताही व्हायरस कारणीभूत नाही.
  • तात्पुरता उपाय म्हणून वारी हनुमान येथील धरणातील पाणी वापरण्याचा सल्ला.

सावधगिरी:

  • पाणी उकळून वापरण्याचा सल्ला.
  • त्वचेसंबंधी कोणतीही समस्या जाणवली तर त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत.

प्रशासनाकडून या समस्येवर योग्य उपाययोजना सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

Leave a Comment