मोठी बातमी! जूनपासून मुलींना आता मोफत उच्च शिक्षण; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणे, दि.11 फेब्रुवारी,2024: येत्या शैक्षणिक वर्षांपासून (2024-2025) महाराष्ट्रातील विद्यार्थिनीला उच्च शिक्षण मोफत असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी आहे त्यांना इंजिनअरिंग व मेडिकल सह 600 अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे.

बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमाच्या दरम्यान पाटील यांनी ही घोषणा केली आहे.परभणीत एका विद्यार्थिनीच्या आत्महत्यानंतर पाटील यांनी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली होती, त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मेडिकल, इंजिअरिंग यासारख्या अभ्यासक्रमांना लाखो रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे घरच्या सामान्य परिस्थितीमूळे मुलींच्या बाबतीत समस्या निर्माण होतात व कित्येक मुली फक्त जास्त फिस असल्यामुळे शिकू शकत नाहीत. आता पाटील यांच्या उच्च शिक्षण ‘मोफत’ असलाच्या घोषनेमुळे मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडणार आहेत.

राज्यातील मुलींच्या शिक्षणात वाढ होण्यासाठी हे पाऊल राज्य सरकार उचलत असल्याच सांगण्यात येत आहे.

Leave a Comment