पुणे, दि 8 फेब्रुवारी, 2024 : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीची टिआरपी नेहमीच अव्वल असल्याच बघायला मिळते. आता स्टार प्रवाह वहिणीवरील प्रसिद्ध मालिका ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘दिपा’ म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे परत नव्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. घरोघरी ‘दिपा’च्या भूमिकेत रेश्मा शिंदेने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आता लवकरच ‘घरोघरी मातीच्या चुल्ही’ या मालिकामध्ये रेश्मा शिंदे झळकणार आहे.तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
‘घरोघरी मातीच्या चुल्ही’ या नावातच मालिकेची कथा दडलेली आहे. प्रत्येक घरात मतभेद असतात परंतु माणसांमुळेच घराला घरपण असते. अशाच माणसांची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार असून, मालिकेची निर्मिती सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने केली आहे. सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेची निर्मितीसुद्धा सुचित्रा बडेकर यांच्या सोहम प्रोडक्शननेच केली आहे व या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता घरोघरी मातीच्या चुल्ही या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.
अभिनेत्री रेश्मा शिंदे ‘घरोघरी मातीच्या चुल्ही’ मालिकेत ‘जानकी’ हे महत्वाच पात्र साकारणार आहे. रेश्मा शिंदेने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.त्यामध्ये ती घरात धूप दाखवताना दिसत आहे. प्रत्येक मुलीच्या मनात असलेलं कुटुंब व रामासारखा पती असावा असे प्रोमोमध्ये दाखवले आहे. रामराज्यपासून चालत आलेला वनवास आताही वेगवेगळ्या स्वरूपात असतो असे काहीसे बोल प्रोमो मध्ये दाखवले आहेत.
रेश्मा शिंदेसोबत प्रमोद पवार, सविता प्रभुणे, भक्ती देसाई, उदय नेते, तसेच आरोही आंबरे सारखे दिग्गज कलाकार असणार आहेत. राहुल लिंगायत मालिकेच दिग्दर्शन करणार आहेत.