Pune : पुण्यात गरीबांना धान्य देण्याच्या बहाण्याने लाखोंचे दागिने पळवले !
हडपसर, पुणे – ५ जून २०२४ : पुण्यातील हडपसर भागात गरीबांना धान्य देण्याच्या बहाण्याने एक ७० वर्षीय वृद्ध महिलेची तब्बल १,८०,००० रुपये किंमतीची फसवणूक करण्यात आली आहे. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात दोन अनोळखी इसम आरोपी आहेत.
घटना ससाणेनगर येथील गणपती मंदिराजवळ सकाळी १०:४५ वाजता घडली. फिर्यादी महिला मंदिराजवळून जात असताना, दोन अनोळखी इसमांनी तिला गरीबांना धान्य देत असल्याचे सांगून फसवणुकीची योजना रचली.
Jobs in pune : महिंद्रा कंपनीत मोठी भरती , कंपनीच्या गेटवर या भरती व्हा ! २० हजार पगार
इसमांनी फिर्यादी महिलेला विश्वासात घेत तिच्या कडील सोन्याचे दागिने व मोबाईल काढून बटव्यात ठेवण्यास सांगितले. त्यांनी महिलेला दिलेल्या पिशवीत बटवा ठेवण्यास सांगून, तो बटवा पिशवीत गुंडाळून महिलेकडे परत दिला. मात्र, हातचालाखीने बटवा काढून नेला आणि या घटनेत फिर्यादीची एकूण १,८०,००० रुपये किंमतीची चोरी झाली.
हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे आणि भादंवि कलम ४२० व ३७९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
Jobs in pune : महिंद्रा कंपनीत मोठी भरती , कंपनीच्या गेटवर या भरती व्हा ! २० हजार पगार
या फसवणुकीची माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या वागणुकीवर विश्वास ठेवू नये आणि अशा प्रकारच्या फसवणूकांपासून सावध राहावे, असे त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे आणि पोलिसांनी या आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.