Pune आज अति मुसळधार पावसाची शक्यता; जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर
प्रादेशिक हवामान केंद्राचा इशारा: ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाची शक्यता; जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे, ८ जुलै २०२४: प्रादेशिक हवामान केंद्राकडून उद्या, ९ जुलै २०२४ रोजी, जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या हवामान इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांनी या सुट्टीची नोंद घ्यावी आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार सुरक्षितता उपाययोजना घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे होणाऱ्या संभाव्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने सज्जता ठेवली आहे.
Monsoon Update पुणे सिटी लाईव्ह मीडिया नेटवर्ककडून
पावसाळ्याच्या ताज्या अपडेट्ससाठी आणि अधिक माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा.
वाचा संबंधित बातम्या: