Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

शिंदे सरकारने मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर केले !

मंत्रिमंडळात नवीन चेहरे, कामकाजात नवी उर्जा

एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर केले

  • राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
  • इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
    • छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
    • दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
    • राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
    • सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
    • हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
    • चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
    • विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
    • गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
    • गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
    • दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
    • संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
    • धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
    • सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
    • संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
    • उदय रविंद्र सामंत- उद्योग
    • प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
    • रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
    • अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
    • दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
    • धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
    • अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
    • शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
    • कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
    • संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
    • मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
    • अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल केले आहेत. या फेरबदलांमुळे राज्याच्या विकासाला चालना मिळेल आणि जनतेला चांगले प्रशासन मिळेल अशी अपेक्षा आहे.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More