3 वर्षाच्या मुलीवर शाळेत अत्याचार, शिक्षिकेवर गुन्हा दाखल
पुणे, 24 ऑगस्ट 2023: कोथरूड परिसरातील एका नामांकित शाळेत 3 वर्षाच्या मुलीवर शिक्षिकेने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिक्षिकेविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी 36 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची तीन वर्षाची मुलगी या शाळेत शिक्षण घेते. शाळेतून घरी आल्यानंतर मुलीने त्याच्या वडिलांकडे तक्रार केली की, शिक्षिका तिला शाळेत केस ओढतात, गालगुच्ची घेतात, हात कापू का म्हणतात आणि मेणबत्तीचे चटके देईन असे धमकी देतात.
फिर्यादी या तक्रारीनंतर थेट पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत शिक्षिकेविरोधात भादवी कलम 323, 506 आणि ज्यूवेनाईल जस्टीस ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक पांढरे अधिक तपास करत आहेत.