Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादच्या दिवशी गर्दी आणि मिरवणुकांचे नियोजन करण्यासाठी शुक्रवारी सुट्टी

0

 गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादच्या दिवशी गर्दी आणि मिरवणुका

गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादच्या दिवशी गर्दी आणि मिरवणुकांचे नियोजन करण्यासाठी शुक्रवारी सुट्टी

पुणे, 27 सप्टेंबर 2023: अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी (दि. 28 सप्टेंबर) होणार आहे. या दोन्ही सणांनिमित्त होणाऱ्या गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार 29 तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून 29 तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाच्या विनंतीचे त्वरीत स्वीकार केले. त्यांनी शुक्रवार 29 तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले.

या निर्णयामुळे राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होईल आणि गर्दी आणि मिरवणुकांचे नियोजन करणे पोलीस प्रशासनास सोपे होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.