पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूकीत बदल

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूकीत बदल

पुणे, दि. १० नोव्हेंबर २०२३: पुणे विद्यापीठ चौक परिसरामध्ये मेट्रो सह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या कामासाठी पिलरचे काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे रस्ता खोदाई व बॅरिकेडींग करण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठ चौक व परिसरातील वाहतूकीत बदल करणे गरजेचे आहे.

या बदलानुसार, औंध रोडवरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.

  • औंध रोडवरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनचालकांनी मिलेनियम गेट (चतुःश्रृंगी पोस्टे) मधुन विद्यापीठामध्ये प्रवेश करावा व मुख्य गेटमधुन बाहरे पडावे (वेळ दररोज सकाळी ०८.०० ते २०.०० वा.)
  • सर्व प्रकारच्या मिनी बस, बस (पी.एम.पी.एम.एल., लक्झरी) यांनी डाव्या बाजुचे लेनचा वापर करावा.
  • तीन चाकी व चारचाकी वाहनचालकांनी उजव्या बाजुचे लेनचा वापर करावा.

हे बदल पुणे विद्यापीठ चौकातील पुलाचे व मेट्रोलाईनचे बांधकाम संपेपर्यत अंमलात राहतील.

वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना या बदलांची नोंद घेऊन वाहतूक करत जाण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment