पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुण्याच्या काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुणे, २४ ऑक्टोबर २०२३: पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून येत्या गुरुवारी (२६ ऑक्टोबर) वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत एसएनडीटी आणि चतु:श्रृंगी, तळजाई, लष्कर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे वारजे, औंध, मुंढवा, कात्रज, खराडी, शिवाजीनगर, डेक्कन, पुलाची वाडी, बाणेर, नगर रस्ता, चंदननगर, हडपसर, महंमदवाडी, ससाणेनगर, काळेपडळ, येरवडा, बिबवेवाडी, बालाजीनगर, इंदिरानगर, तळजाई परिसर, कात्रजचा काही भाग आदी भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी याबाबतची कल्पना ठेवून पाण्याची बचत करण्याचा सल्ला महापालिकेने दिला आहे.

हेही वाचा:
पुणे महापालिकेची नवीन निवडणूक प्रक्रिया जाहीर
पुण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचा खच, महापालिकेला फटकार
पुण्यातील एमआयडीसीत नवीन औद्योगिक वसाहत उभारणार

Leave a Comment