पुणे, दि. ३ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, स्ट्रेटेजिक कल्चर सिक्युरिटी फाऊंडेशन, फ्लेम विद्यापीठाचे सेंटर फॉर साऊथ ईस्ट एशिया स्टडीज आणि सेंटर फॉर साऊथ ईस्ट एशियन स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत आणि तैवान यांच्यातील लोकशाही शासनाची तुलना’ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथील वायसी- निसदा सभागृह येथे होणार आहे.
या परिषदेसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ व्यक्ती आपले विचार मांडणार आहेत अशी
माहिती संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय खरे यांनी दिली. सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. (डॉ.) कारभारी काळे आणि व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र
शिंगणापूरकर उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
ही एक दिवसीय परिषद गुरुवार, ४ मे २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून वायसी – निसदा सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होईल. ही आंतरराष्ट्रीय परिषद ऑफलाइन पद्धतीने आयोजित केली जाईल. या परिषदेत सहभागी होऊ इच्छित व्यक्तींना पूर्व नोंदणी आवश्यक आहे.