हडपसरमधील भव्य मराठा मोर्चाला आमदारांनी दांडी मारली
पुणे, 1 नोव्हेंबर 2023: हडपसर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आज (बुधवार) भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हडपसरचे आमदार चेतन तुपे उपस्थित नव्हते. त्यांनी ससाणेनगर साखळी उपोषणाला भेट दिली, परंतु मराठा कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला आणि उपोषणाला बसू नका, तुम्ही विधानभवनात जाऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा असे सांगितले. त्यानंतर आमदार तुपे यांनी मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे पत्र दिले.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊन पुणे महापालिकेची निवडणूक लढवली होती, त्यातून ते नगरसेवक झाले. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा लढवली व हडपसरमधून आमदार म्हणून निवडून आले.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना राज्यातून मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळत आहे.
आमदार तुपेंची भूमिका संदिग्ध
आमदार चेतन तुपे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पत्र दिले असले तरी, हडपसरमधील भव्य मराठा मोर्चाला उपस्थित न राहणे आणि ससाणेनगर साखळी उपोषणाला भेट देऊनही उपोषणाला बसणे यामुळे त्यांची भूमिका संदिग्ध ठरली आहे.