तुमसर: तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील एका प्रसिद्ध हॉटेलचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हॉटेलमध्ये सर्व्ह केलेल्या पोह्यात मुंग्या आणि इतर किडे आढळून आले आहेत.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अन्न सुरक्षेबाबत इतकी दुर्लक्ष करणे हे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.