होलीक्रेसेंट इंग्लिश शाळेला खासदार इम्तियाज जलील यांची सदिच्छा भेट

होलीक्रेसेंट इंग्लिश शाळेला खासदार इम्तियाज जलील यांची सदिच्छा भेट

संभाजीनगर (औरंगाबाद ) बीड बायपास येथील होली क्रेसेंट इंग्लिश शाळेस औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी सदिच्छा भेट दिली या ठिकाणी शाळेचे मोहम्मद इम्तियाज सर,रुहाना शफीउद्दीन मॅडम,मोहम्मद सुमैर,मोहम्मद सोहेल व इतर शाळेच्या शिक्षकांकडून आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले 26 जानेवारी शुक्रवारी सकाळी 11 वाजता खासदार साहेबांनी शाळेत भेट दिली याप्रसंगी सुरुवातीस स्वागत गीत विद्यार्थ्यांनी गायन करत पाहुण्यांचे स्वागत केले शाळेतील विद्यार्थ्यांनी गणित विषयाची प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर केले त्याचप्रमाणे विविध देशभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांचा नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक या कार्यक्रमास उपस्थित होते खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेब यांच्यासह Aimim संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर,मनपा गटनेते नासेर सिद्दिकी,युवा जिल्हा कार्याध्यक्ष जावेद खान,युवा जिल्हा महासचिव शेख कलीम,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अनिस पटेल,साबेर पटेल,सय्यद युसुफ,असद चाऊस, युवा जिल्हा सचिव शेख मोबीन एन के आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमास हजेरी लावली

Leave a Comment