पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस चा एक जीवघेणा प्रकार समोर आला आहे . कुर्ला नेहरूनगर(मुंबई) ते पिंपळगाव रोठा(नाशिक) या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या बसचा संपूर्ण गिअर बॉक्स बस चालू असतानाच तुटला बस मध्ये ५० प्रवासी होते ,
ST बस चालू असताना ही घटना घडल्यामुळे सर्वच प्रवाशांचे प्राण धोक्यात आले असते. मात्र पुढे जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व 50 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.