शिंगरोबा मंदिराजवळ अपघात , ११ जणांचा मृत्यू २२ जण जखमी ,मुंबई पुणे हायवे वरील घटना
जुन्या पुणे-मुंबई (Pune-Mumbai Highway) महामार्गावर रायगड (Raigad) जिल्ह्यातील शिंगरोबा मंदिराजवळ खासगी बस खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 28 जण जखमी झाले. आज पहाटे झालेल्या या अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बस पुण्याहून मुंबईकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी खड्ड्यात जाऊन आदळली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर बचाव पथकांनी ढिगाऱ्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
स्थानिक पोलिसांसह अग्निशमन विभाग आणि वैद्यकीय कर्मचारी बचाव कार्यात सहभागी झाले होते. जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
At least 11 people have died and 28 others injured after a private bus fell into a ditch near Shingroba temple in Raigad district on old Pune-Mumbai Highway.#pune #bus #accident #highway #old #injured #rescue #punenews pic.twitter.com/kNDSgngFGY
— Pune Mirror (@ThePuneMirror) April 15, 2023