Pune : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला

Pune : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला

 टिळक रस्त्यावर बुधवारी पहाटे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर तिघांनी कोयत्याने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी दोन तासांत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी यल्लाप्पा आरोटे (वय 19, रा. नांदेड, सध्या रा. हत्ती गणपती, सदाशिव पेठ) हा तरुण सदाशिव पेठेतील एका अभ्यासिकेतून घरी जात होता. त्यावेळी शक्ती स्पोर्टच्या समोर तिघांनी दुचाकीवरून आले आणि त्याला अडवलं. त्याच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. बालाजीने बचाव केला असता त्याच्यावर एक वार झाला.

या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने बालाजीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अजूनही या घटनेचे कारण शोधत आहेत.

Leave a Comment