अहमदनगर : विहिरीत आढळले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह , तपास सुरु !
माळीबाभुळगाव येथील पोल्ट्रीफार्म शेजारील विहरीत चौघांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पाथर्डी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
हे वाचा –Anganwadi Bharti Ahmednagar 2023
नांदेडच्या करोडी येथील धम्मपाल सांगडे हा पत्नी कांचन, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीचे काम करीत होता. धम्मपालची पत्नी कांचन आणि मुलांचे मृतदेह विहिरीत आढळला आहे. पोलिसांनी मयत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे.