Aimim तर्फे घरकुल योजनेच्या माहितीसाठी पत्रकार परिषद संपन्न
औरंगाबाद प्रतिनिधी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन औरंगाबाद तर्फे महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या घरकुल योजनेच्या माहितीसाठी पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये घरकुल योजनेसंबंधी माहिती औरंगाबाद जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर आणि शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांनी दिली औरंगाबाद शहरासाठी चार ठिकाणी एकूण 11220 घरे बनवण्यात येणार असून घरकुल योजनेसाठी 43 हजार 43 लोकांनी आवेदन केले होते त्यापैकी 40,हजार 58 अर्ज पात्र ठरविण्यात आले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 11हजार 120 लाभार्थ्यांना घरे देण्यात येणार आहेत सुंदर वाडी साठी 9 लाख 27 हजार,तिसगाव साठी 9 लाख 27 हजार ,तिसगाव गट नंबर २२७/१ साठी 9 लाख 45 हजार,पडेगाव गट नंबर 69 साठी 9 लाख 56 हजार 970,हर्सूल साठी 12 लाख असे वेगवेगळे दर या घरांसाठी ठरवण्यात आलेले आहेत यामधून प्रत्येकी 2 लाख 50 हजार सबसिडी ही प्रधानमंत्री आवास योजनेतून देण्यात येणार आहे ज्या लाभार्थ्यांकडे कामगार कार्ड असतील त्यांच्यासाठी आणखीन 2 लाख सबसिडी मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये महानगरपालिकेतर्फे लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या स्थळासाठी पत्र निघणार असून प्रत्येकाने 5000 रुपये भरून पुढील प्रक्रियेसाठी संमती दर्शवायची आहे त्यानंतर लकी ड्रॉ नुसार पहिल्या टप्प्यात 11हजार 120 लाभार्थ्यांना घरकुल योजनेतून घरासाठी अलॉटमेंट लेटर देण्यात येणार आहेत ज्या लाभार्थ्यांना गृह कर्ज हवे असेल त्यांना कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यात घेता येणार आहे.
लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये काही माहिती हवी असल्यास दारूस्सलाम या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत संपर्क करावा असे आवाहन समीर साजिद बिल्डर यांनी केले आहे या पत्रकार परिषदेत युवा जिल्हा कार्याध्यक्ष जावेद खान, एम.एम.शेख,साबेर शेख,शेख ईरशाद,मंजूर शेख आदी उपस्थित होते