Ambegaon pathar pune : आंबेगाव पठारावर गटाराचे चेंबर फुटले, नागरिकांमध्ये नाराजी

Ambegaon pathar news : पुणे महानगरपालिकेच्या आंबेगाव पठारावरील सर्वे नंबर १५ लेन नंबर चार व पाच च्या बरोबर वरती गटाराचे चेंबर फुटले आहे. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर पसरले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शाळेतील मुलांना व वयोवृद्ध लोकांना रस्ता ओलांडताना त्रास होत आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

स्थानिक नागरिकांनी याबाबत महानगरपालिकेला तक्रार केली आहे. महानगरपालिकेच्या सफाई विभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. गटाराचे चेंबर दुरुस्तीसाठी पाच दिवस लागतील, असे सफाई विभागाकडून सांगण्यात आले आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यांनी महानगरपालिकेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment