---Advertisement---

बाणेर रोडवर मेट्रोचे काम सुरु, वाहतूक बंद

On: August 11, 2023 9:26 AM
---Advertisement---

बाणेर रोडवर मेट्रोचे काम सुरु, वाहतूक बंद

baner pune  : पुणे महानगरपालिके (Pune Municipal Corporation) च्या चतुःश्रृंगी वाहतूक विभाग ( transport department) अंतर्गत बाणेर (Baner)रोडवर मेट्रोचे काम सुरु आहे. या कामाअंतर्गत बाणेर रोडवरील ग्रीन पार्क हॉटेल जंक्शन ते पल्लोड फार्म रोड दरम्यान पोर्टल बिम लॉचींगचे काम करण्यात येणार आहे. सदरचे काम करतेवेळी बाणेर रोडवरील वाहतूक सुरळीत राहणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१/ सीआर – ३७ / टीआरए २ दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायदा कलम – ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये पोलीस उप-आयुक्त वाहतुक शाखा, पुणे शहर, बाणेर रोडवरील पुणे विद्यापीठ ते बाणेर रोडकडे जाणाऱ्या वाहतूकीमध्ये दि. १२/०८/२०२३ रोजी ००.०१ ते दि. १५/०८/२०२३ रोजी २४.०० वा. पर्यंत खालीलप्रमाणे बदल करीत आहेत.

  • बाणेर रोडवरील ग्रीन पार्क हॉटेल जंक्शन ते महाबळेश्वर हॉटेलकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे.

  • पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत:

    • पुणे विद्यापीठ चौकाकडून अभिमान श्री. जंक्शन येथून बाणेर कडे जाणाऱ्या वाहनचालकांना बाणेर फाटा चौकामध्ये उजवीकडे वळण घेवून आय. टी. आय. रोडवरील परिहार चौक्, डावीकडे वळण घेवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे, नागरस रोडवरुन महाबळेश्वर हॉटेलजवळ बाणेर रोडवर येवून इच्छितस्थळी जाता येईल.
    • ग्रीन पार्क हॉटेल चौकामधून डावीकडे वळण घेवून सोमेश्वर मंदिर मार्गे रामनदीवरील पुलानंतर उजवीकडे वळण घेवून पासपोर्ट कार्यालयासमोरुन बाणेर रोडवर येवून इच्छितस्थळी जाता येईल.

या बदलामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वेळेवर नियोजन करून प्रवास करावा.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment