पुणे,दि.23 जानेवारी 2024 : शेकडो वर्षांपासुन प्रभु श्री रामांच्या मंदिराचे स्वप्न अखेर सफल झाले. त्यामुळे संपूर्ण देशभरात रामभक्तांनी उत्साहाने हा सोहळा साजरा केला आहे. श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठा निमित्त पुनावळे येथील 41 एस्टेरा सोसायटीमध्ये लेझिम,ढोल ताशांच्या गजरात प्रभु रामांची भव्य रथ यात्रा काढण्यात आली.
अयोध्येतील दिमाखदार सोहळ्यानिमित्त पुनावळे येथील श्री संत सावतामाळी मंदिरापासून सोसायटीच्या मुख्य द्वारापर्यंत ढोल – ताशे व लेझिम खेळत श्री रामांची भव्य रथ यात्रा काढण्यात आली. महिलांनी स्वस्तिक व कलश आकाराच्या आकृतीत लेझिम खेळत आपला जल्लोश व्यक्त केला. 41 एस्टेरा परिवाराकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राम रक्षा पठण, राम पठण,भजन, किर्तन व हवन करून श्री रामाच्या प्रतिमेला अक्षदा व पुष्पांजलि अर्पण करण्यात आली. तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण सोसायटी भगव्या रंगात रंगुन गेली होती, सर्वत्र राम नामाच्या पताका,झेंडे व रांगोळी काढण्यात आल्या.
*हे वाचा*
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त एस्टेरा परिवारातील चिमुकल्यांनी विविध रूपं साकारली होती. श्री रामासह,लक्ष्मण, सिता व हनुमान यांच्या वेषभूशेसह इतर मुलांनी नृत्य सादर केलं. हा नजारा खुप नयनरम्य होता.
*1008 दिव्यांची रोशनाई*
41 एस्टेरा सोसायटीच्या आवारात रात्री 1008 दिवे लावण्यात आले.हे दिवे जय श्री राम नावाच्या स्वरूपात लावण्यात आले.तसेच राम नामाच्या गजर करत फटक्यांची आतेशबाजी करण्यात आली असुन संपूर्ण परिसरात आनंदाचं व चैत्यन्याचं वातावरण पसरलं आहे.