Chakan : चाकणमध्ये सासरच्यांच्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या
चाकणमध्ये सासरच्यांच्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या
पुणे, 06 जानेवारी 2024: पुणे जिल्ह्यातील चाकण तालुक्यातील खंडोबा माळ येथे सासरच्यांच्या छळामुळे विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासरे आणि दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचा – Digital 7/12 : डिजिटल ७/१२ कसा काढतात , फायदे काय ?
या प्रकरणी फिर्यादी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, त्यांची बहिण (मयत) वय 36 वर्षे हि खंडोबा माळ येथे राहत होती. तिचे लग्न सचिन सुभाष गुप्ता यांच्याशी झाले होते. तिला चार मुली आहेत.
फिर्यादी यांच्या मते, सासरच्यांनी तिला माहेराहून पैसे आणण्याच्या कारणावरून तसेच तिला चार मुली झाल्या व मुलगा झाला नाही या कारणावरून शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळामुळे तिला आत्महत्या करणास प्रवृत्त केले.
हे वाचा – पोस्ट ऑफिस भरती 2023 : 30041 पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
दि. 02 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1:00 वाजता फिर्यादी यांची बहिण हिने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पती सचिन गुप्ता, सासरे सुभाष गुप्ता, सासू कल्पना गुप्ता आणि एक महिला आरोपी यांच्याविरोधात भादवि कलम 306,498 (अ), 323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी पती सचिन गुप्ता याला अटक केली आहे. इतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.