---Advertisement---

स्वारगेट : इंन्स्टाग्राम वर झालं प्रेम ! भेटण्यास बोलावुन केला रेप ,तसले फोटो काकाला पाठवले !

On: December 24, 2022 4:57 PM
---Advertisement---

Pune City Live News

 

Pune City Live News: इंन्स्टाग्रामवरुन ओळख निर्माण करुन, भेटण्यास बोलावुन जबरदस्तीने बलात्कार करुन, अश्लिल फोटो व्हायरल करणा-या आरोपीस उस्मानाबाद येथुन स्वारगेट पोलीस स्टेशनकडुन अटक करण्यात आली आहे .

यातील पिडीत मुलीला इंन्स्टाग्राम यावरुन फ्रेंड रिक्वेस्ट व मेसेजेस पाठवुन ओळख निर्माण केली होती .ओळख झाल्याने तिला गोड बोलुन भेटण्यासाठी बोलावुन जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापीत करुन पिडीत मुलीला न कळता तीचे अश्लिल फोटो काढुन सदरचे फोटो इंन्स्टाग्राम अकाऊंटवरती व पिडीत मुलीचे काका यांचे वॉट्सअपवरती पाठवुन पिडीत मुलीची बदनामी केल्याने, सदरच्या पिडीत मुलीने तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

 

दाखल गुन्हयातील आरोपी नामे संजय ऊर्फ ज्ञानेश्वर बाळु सितापे, हा मिळुन येत नव्हता. तो पोलीसांना गुंगारा देत होता. परंतु पोलीसांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषन करुन स्वारगेट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार फिरोज शेख व शिवा गायकवाड यांनी त्यास सुरडी, ता.जिल्हा उस्मानाबाद येथुन जेरबंद केले असुन त्याब्यात घेवुन त्यास त्याचा नाव विचारता त्याने त्याचे नाव संजय ऊर्फ ज्ञानेश्वर बाळु सितापे, वय १९ वर्षे, रा. चिंचोली सोन अवासा, ता. अवासा, जि.लातुर असे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास दि. २२/१२/२०२२ रोजी अटक करणेत आलेली आहे.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment