Good news: Gauri Ganapati ration of happiness on ration! : राज्यातील शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’ संच मिळणार
Gauri Ganapati : या गौरी गणपतीच्या उत्सवात, राज्यातील १ कोटी ७० लाख शिधापत्रिका धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या गौरी गणपतीत, राज्य सरकारतर्फे ‘आनंदाचा शिधा’ संच दिला जाणार आहे. या संचामध्ये एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि १ लीटर सोयाबीन तेल यांचा समावेश आहे.
वाटपाची तारीख १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२४ अशी आहे. या उपक्रमामुळे शिधापत्रिका धारकांना उत्सवाच्या निमित्ताने मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा गौरी गणपती अधिक आनंददायी ठरणार आहे.