Hadapsar : पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या प्रकरणात अटकेतून सुटलेल्या आरोपीने हॉटेल मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी हॉटेल मालकाने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ४२ वर्षे वय असून ते हडपसर येथे कानिफनाथ अमृततुल्य हॉटेल चालवतात. सन २०२१ मध्ये पापडे वस्ती येथे एका व्यक्तीची हत्या झाली होती. या प्रकरणात दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी या प्रकरणात पोलिसांना मदत करत होते.
दिनांक ०१ डिसेंबर २०२३ रोजी रात्री १९:०० ते १९:१५ वाजण्याच्या दरम्यान दोन अनोळखी व्यक्ती हॉटेलमध्ये आल्या. त्यांनी फिर्यादी यांना “माझ्यावर मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता, त्यावेळी तु पोलीसांना मदत करत होता ना, आता मी सुटून आलो आहे, आता तुला दाखवतो” असे म्हणून त्यांच्यावर हल्ला केला.
हे वाचा – Scheme For Women : महिलांसाठी नवीन पेन्शन योजना! महिन्याला मिळणार 10,000 रुपये
आरोपींनी फिर्यादी यांचे हॉटेलमधील खुर्च्या, टेबल फेकून दिले. तसेच हॉटेलमधील काऊंटरची काच फोडली. त्यांच्या हातातील लोखंडी धारदार शस्त्रे हवेत फिरवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
हे वाचा – Alandi : कार्तिक यात्रा-२०२३ अनुषंगाने वाहतूक बदल !
पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे यांच्या तपासात असे आढळून आले की, आरोपी हेच सन २०२१ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणातील आरोपी आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
या घटनेमुळे हडपसर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.