how to check rte student list : आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टल sms या तारखेपर्यंत येणार !
आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
Iphone 13 Price Mumbai: Iphone 13 जाणून घ्या Iphone 13 ची किंमत खतरनाक फीचर्स
1. निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत 13 एप्रिल 2023 पासून 25 एप्रिल 2023 पर्यंत आहे. प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आणि आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.
2. निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी काढून घ्यावी. पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.
Apple Retail Store Mumbai: मुंबईतील Apple स्टोरमध्ये नेमके काय खास आहे ?
3. आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2023-24 या वर्षाकरिता लॉटरी द्वारा निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी तीन नंतर आरटीई पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल तसेच निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी
4. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.
5. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.