इंडियन मिलिटरी अकादमी देहराडूनच्या 2023 च्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर झालेली आहे. या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजच्या जाहिरातीमध्ये दिली आहे, त्यानुसार आपले अर्ज 45 दिवसांच्या आत पोहोचवे लागेल.
एकूण रिक्त जागा: 13
खालीलप्रमाणे आहेत रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:
1) एमटी ड्रायव्हर (ग्रेड II) – 10 जागा
शैक्षणिक पात्रता: इच्छुक उमेदवाराकडे वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे किमान 15 वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव असला पाहिजे. त्यांच्याकडे सहा महिने पेक्षा कमी कालावधीचा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असला पाहिजे.
ऐच्छिक पात्रता: वाहनाची देखभाल किंवा ट्रान्सपोर्ट सुपरवायझरच्या कामाशी संबंधित कोर्स केलेला असल्यास निवड प्रक्रियेत प्रधान्य दिला जाईल.
2) एमटी ड्रायव्हर (OG) – 03 जागा
शैक्षणिक पात्रता: इच्छुक उमेदवाराकडे वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे किमान 15 वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव असला पाहिजे. त्यांच्याकडे सहा महिने पेक्षा कमी कालावधीचा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असला पाहिजे.
ऐच्छिक पात्रता: वाहनाची देखभाल किंवा ट्रान्सपोर्ट सुपरवायझरच्या कामाशी संबंधित कोर्स केलेला असल्यास निवड प्रक्रियेत प्रधान्य
दिला जाईल. एचएमटीसारखा तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यास जास्त प्राधान्य मिळेल.
वयोमर्यादा: 56 वर्षे
परीक्षा फी: फी नाही
निवड प्रक्रिया:
चाचणी आणि मुलाखतीद्वारे
इतर माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकता, ज्याचा पत्ता खालीलप्रमाणे आहे:
अधिकृत संकेतस्थळ: indianarmy.nic.in
नोकरीचे ठिकाण: उत्तराखंड
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता: कमांडंट, इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून- २४८००७