Alandi : कार्तिक यात्रा-२०२३ अनुषंगाने वाहतूक बदल !
कार्तिक यात्रा-२०२३ अनुषंगाने वाहतूक बदल ( Kartik Yatra 2023, Traffic Diversions in Pune)
पुणे, दि. ५ डिसेंबर २०२३: संत श्री. ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिक यात्रा २०२३ दि. ०५/१२/२०२३ ते १२/१२/२०२३ या कालावधीत साजरी होणार आहे. सदर कालावधीत आळंदी येथे भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते व त्यामुळे मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या परिसरातील वाहतूक सुरळीत रहावी याकरीता वाहतूकीत आवश्यकतेनुसार बदल करणे गरजेचे आहे.
Scheme For Women : महिलांसाठी नवीन पेन्शन योजना! महिन्याला मिळणार 10,000 रुपये
याकरीता महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र.एम.व्ही.ए.०१९६/८७१/ सीआर-३७/ टिआरए-२, दिनांक-२७/०९/१९९६ चे नोटीफीकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५,११६(१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये पोलीस उप आयुक्त, वाहतूक, पुणे शहर विजयकुमार मगर यांनी खालीलप्रमाणे वाहतूक बदल केला आहे.
- दि. ०५/१२/२०२३ ते १२/१२/२०२३ रोजी दरम्यान अहमदनगर कडुन मरकळमार्गे आळंदीकडे जाणारी जड वाहतूक बंद करण्यात येत आहे.
- या वाहनांनी पर्यायी मार्ग म्हणून अहमदनगर नगर रोडने लोणीकंद आंबेडकर चौक- आळंदी रोड जंक्शन- चंद्रमा चौक – शास्त्रीनगर चौक – गोल्फ क्लब चौक होळकर पुलावरुन पोल्ट्री फार्म चौक जुना पुणे मुंबई रोडने बोपोडी चौक- नाशिक फाटा मार्गे इच्छितस्थळी जावे.
या वाहतूक बदलामुळे भाविकांना तसेच इतर वाहनचालकांना वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
Kalabhairav Jayanti Marathi : उद्या कालभैरव जयंती , जाणून घ्या महत्व आणि माहिती !
कार्तिक यात्रा-२०२३
कार्तिक यात्रा ही महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक यात्रा आहे. ही यात्रा दरवर्षी कार्तिक महिन्यात आळंदी येथे साजरी केली जाते. या यात्रेचे आयोजन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त केले जाते.
या यात्रेसाठी महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक आळंदीला येतात. या यात्रेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी होतात.
या यात्रेमध्ये दीपदान, कीर्तन, भजन, प्रवचन, अन्नदान इत्यादी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
कार्तिक यात्रा ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची सांस्कृतिक परंपरा आहे. ही यात्रा महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते.
कार्तिक यात्रा-२०२३ दि. ५ डिसेंबर २०२३ ते १२ डिसेंबर २०२३ या कालावधीत साजरी होणार आहे.