धायरीतील भाजी मंडईत मोठे मोठे खड्डे; नागरिकांनी केली महापालिकेवर टीका !
धायरीतील भाजी मंडईतील मोठे मोठे खड्डे; नागरिकांनी केली महापालिकेवर टीका
पुणे, २९ ऑक्टोबर २०२३: धायरीतील (dhayari news today) भैरवनाथ मंदिर परिसरातील भाजी मंडईतील मोठे मोठे खड्डे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत.(dhayari news marathi) या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना गळ्याला पट्टे लागले आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना १० दिवसांपूर्वी जाब विचारण्यात आला होता, परंतु त्यांनी ड्रेनेजचे पाणी वरुन खाली येत असल्याचे कारण देऊन खड्डे बुजवण्याची जबाबदारी टाळली.(dhayari pune news)
यासंदर्भात नागरिकांनी महापालिकेवर टीका केली आहे. नागरिकांनी म्हटले आहे की, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कामचुकार आहेत. ते आश्वासन देतात, परंतु त्यांची जबाबदारी पूर्ण करत नाहीत. यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे.
यासंदर्भात महापालिकेने लवकरच उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सौरभ संजयकाका पवार यांनी सांगितले की, “धायरीतील भाजी मंडईतील मोठे मोठे खड्डे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना गळ्याला पट्टे लागले आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना १० दिवसांपूर्वी जाब विचारण्यात आला होता, परंतु त्यांनी ड्रेनेजचे पाणी वरुन खाली येत असल्याचे कारण देऊन खड्डे बुजवण्याची जबाबदारी टाळली.
मग त्यांना सांगितले मग ते ड्रेनेजचे काम कधी तुम्ही करणार सुरू आहे. सुरू करु कधी होणार आज जे आम्ही वारंवार सांगतोय महानगरपालिका निवडणूक लवकर घ्या कारण नागरिकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे.
यासंदर्भात यापरिसरातील आधिकारी एवढे सुस्त का आहेत. संवेदनशीलपणा राहिला आहे कि नाही माझी यासंदर्भात पुणे महानगरपालिका यांना पुन्हा विनंती आहे. आश्वासन आधिकारी नाही नगरसेवक देतात तुम्ही आधिकारी आहात कर्मचारी आहात काम करुन देणे तुमचे कर्तव्य आहे आणि ते करण्यात तुम्ही काम चुकारपणा करता आहात ठेकेदार कामचुकार पणा करतो यामुळे हि परिस्थिती आहे यासंदर्भात कृती हवी.“